लाडकी बहिन योजना २१००
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मतदार ओळखपत्र
- मूळ पत्ता पुरावा
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
- शिधापत्रिका
- बालिका योजना फॉर्म
- हमीपत्र
माझी लाडकी बहिन योजना 2025 साठी पात्रता
- माझी लाडकी बहिन योजना : २१ ते ६५ वयोगटातील महिलांना २१०० रुपये दिले जातील.
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- जर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतीही चारचाकी वाहने असतील त्यांना अपात्र ठरवण्यात येईल.
- महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- लाभार्थी महिलेला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ मिळत नसावा.
- महिला आणि तिचे कुटुंब आयकर भरणारे नसावे.
- महिलेच्या बँक खात्यात डीबीटीचा पर्याय सक्रिय असावा.
- माझी लाडकी बहिन योजनेचा जानेवारीचा हप्ता फक्त लाभार्थी विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांनाच उपलब्ध असेल.