अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
नमस्कार मित्रांनो, शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे. या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागीय स्तरावरील _ शहर स्तरावरील तांत्रिक तज्ज्ञांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करावे, असे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे उपसचिव आणि अभियान संचालक आणि राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन प्रणालीचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० बाबत कोकण विभागाची कार्यशाळा बीकेसी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडाचे मुख्य अभियंता आडे, म्हाडाचे आर्थिक नियंत्रक अजयसिंग पवार, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, विभागीय आणि शहर पातळीवरील तांत्रिक तज्ज्ञ इत्यादी उपस्थित होते.
अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सामान्य जनतेसाठी परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये, केंद्र सरकारने या नवीन टप्प्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानंतर, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राज्यात २०१५ पासून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) लागू करण्यात आली आहे. राज्यातील ३९९ शहरांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे आणि आतापर्यंत १४.७० लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ३.७९ लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) वरदान ठरली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात, घरे अधिक सुधारित स्वरूपात बांधली जातील.
अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
रणादेव पाडे